जळगाव (प्रतिनिधी) – समाजाने केलेला सत्कार म्हणजे प्रोत्साहन असून हा अविस्मरणीय असतो. गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती सोबतच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे. मोबाईलच्या क्षणिक सुखाला बळी न पडता मोबाईलचा वापर हा गरजेपुरता झाला पाहिजे. संत महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे विचार आत्मसात करून युवकांनी उच्च शिक्षण घ्यावे व मोठे अधिकारी होऊन समाजाचा नावलौकिक करावा व समाजशील नागरिक बनावे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
येथील राधा कृष्ण मंगल कार्यालयात गुरू रविदास क्लब, संत रोहिदास प्रतिष्ठान व संत शिरोमणी रविदास बहुद्देशीय संस्था यांचे वतीने आयोजित जळगाव जिल्हा चर्मकार समाज गुणवंत गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे तर प्रमुख अतिथी म्हणून आ.राजुमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, गुरु रविदास क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, राजेंद्रजी बावस्कर, संजय खामकर, भानुदास विसावे, नगरसेविका सौ. सुरेखा तायडे, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने , मुख्याधिकारी गजानन तायडे, गटविकास अधिकारी रमेश वाघ, ऍड .शैलेंद्र पवार, चेतन तायडे, विश्वनाथ सावकारे, वसंत नेटके, यशवंत ठोसरे, विजय पवार, सुरेश सोनवणे आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनीभविष्यातही कष्ट, जिद्द व चिकाटी ठेऊन यश संपादन करा. समाज हितासाठी आपण काही देणं लागतो या भावनेने संस्कार जोपासत कार्य करावे असे आवाहन केले.सुरुवातीला गुरु रविदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ.सुनील सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून समाजातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कास धरली पाहिजे व समाज संघटनासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन दांडगे व प्रा. स्मिता जयकर यांनी तर संजय वानखेडे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गुणवंतांचा झाला सत्कार !
यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर तसेच डिप्लोमा, स्कॉलरशिप, नीट जेईई व व अन्य स्पर्धात्मक परीक्षा मधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचापालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. दहावी व बारावी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे 2001, 1500 व 1001रु. अशा रोख रकमेसह सन्मानचिन्ह, संस्कार पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच दहावी, बारावीतील अन्य गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व रोख दोनशे रुपये देऊन गौरविण्यात आले. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रवेशित विद्यार्थ्यांना राजेश वाडेकर यांचे वतीने प्रत्येकी एक हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.यांच्या उपस्थिती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विठ्ठल सावकारे, डॉ. सुनील निंभोरे, प्रकाश रोजतकर, निवृत्ती सूर्यवंशी, जगन्नाथ निंभोरे, गणेश सूर्यवंशी, कैलास वाघ, अरुण नेटके, रवी नेटके, प्रदीप शेकोकार परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी प्रशांत सोनवणे व जगन्नाथ निभोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समाज बांधवांनी, कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे देणगी देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.