जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कुटुंबप्रमुक उद्धव ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आज जिल्हा शासकीय रुग्णालयात अन्नवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना अन्नाचे वाटप केले तसेच रुग्णालयाच्या आवारात अन्नवाटपाचा सामाजिक उपक्रम युवासेना जळगाव शहरा मार्फत घेण्यात आला. यावेळी महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, विधानसभा क्षेत्र युवा अधिकारी अमित जगताप, युवासेना जिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी, उपजिल्हाधिकारी विशाल वाणी, जिल्हा चिटणीस अंकित कासार, जिल्हा सरचिटणीस जय मेहता महानगर युवा अधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे, शहर सनव्यक महेश ठाकूर, शहर युवा अधिकारी गिरीश कोल्हे, अजिंक्य कोळी, उपमहानगर युवा अधिकारी गजानन कोळी, राहुल शिंदे, तुषार पाटील, संस्कार पाटील, निलू जोशी आदी कार्यकर्त्यांनी उपस्थिती दिली.