धरणगाव/जळगाव (प्रतिनिधी) – कवठळ, धार, शेरी आणि पथराड या गावांमध्ये आज गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीने इतिहास रचला. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव भव्य घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. रॅली दरम्यान गावा – गावांमध्ये उत्साहाला उधाण आले होते. प्रत्येक ठिकाणी रांगोळ्या, भगव्या झेंड्यांची सजावट, आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गुलाबराव पाटील यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी “धनुष्यबाणाला साथ, विकासाला मत” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शेकडो महिलांनी औक्षण करून तर युवकांनी पुष्पवृष्टी करून गुलाबराव पाटील यांचे स्वागत करत गावातील निष्ठा आणि प्रेम दाखवून दिले. गावातील मिरवणुकीसाठी विशेषतः सजवलेल्या घोड्यांवरून गुलाबराव पाटील यांचा प्रचार हा ग्रामस्थांसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरला. संपूर्ण रॅलीत भगव्या झेंड्यांचा वापर आणि घोषणाबाजीने परिसर भगवामय होवून गेला होता.
गुलाबराव पाटील यांनी प्रचार दरम्यान संवाद साधतांना गावा -गावच्या विकासाच्या मुद्द्यांवर भर देत, “धनुष्यबाणाला आपला आशीर्वाद द्या, तोच आपल्या विकासाचा हक्काचा रस्ता आहे,” असे आवाहन केले. ग्रामस्थांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकमुखाने ‘लाडक्या बहिणींची एकच निशाणी – धनुष्यबाण’ असल्याचे ठामपणे सांगितले. रॅलीदरम्यान “लाडक्या बहिणींचा एकच भाऊ – गुलाब भाऊ!” अशी जोरदार घोषणा देत ग्रामस्थांनी गुलाबराव पाटील यांच्यावरचा विश्वास अधोरेखित केला. रॅलीमुळे कवठळ, धार, शेरी आणि पथराड या गावांमध्ये निवडणुकीत वातावरण ढवळून निघाले आहे.
कार्यकर्त्यांची भक्कम फौज
रॅलीत रॉ का.चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार, संजय पाटील सर, गजानन पाटील, डी. ओ. पाटील, नाटेश्वर पवार, शामकांत पाटील, निर्दोष पवार, पी. एम. पाटील सर यांच्यासह कवठळ -.मिलिंद पाटील, माधव पाटील, अनिल पाटील, नितीन सोनवणे, सुनील सोनवणे, चंद्रकांत चौधरी, महेश पवार, नाटेश्वर पवार, चोरगाव – नाना सोनवणे, भागवत मोरे, जंगलू सोनवणे, जिजाब शिंदे, मस्तान शहा, किशोर झंवर, धार- उदयभान सोनवणे, ललित पाचपोळ , सौरभ पाचपोळ , डॉ. ओंकार मुंदडा, दीपक सावळे, शेरी – सुधाकर पाटील, नरेश पाटील, भिकन कोळी, कैलास पाटील, एम.डी. कुमावत, देविदास चौधरी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्यासोबत कवठळ, धार, शेरी आणि पथराड येथील स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आपल्या मोठ्या उपस्थितीने रॅलीचा उत्साह द्विगुणित केला.