जळगाव (प्रतिनिधी) – अखिल स्तरीय महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या जळगाव शहराध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्ष पदी- पंकज वसंत कोळी, सचिव पदी- महेश राजगोपालजी राठी, आणि कार्याध्यक्ष पदी इरफान जाहीर शेख यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजिज शेख यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सागर रमेश खराटे, सचिव विकास शामराव शिरसाठ, कार्याध्यक्ष आकाश सुभाष उसराटे, खजिनदार सुशील कैलास गणोरे उपस्थित होते.
निवडीनंतर शेख यांनी पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र दिले. दरम्यान जळगाव शहराध्यक्ष पदी मुविकोराज कोल्हे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
सेतू चालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार ! मुविकोराज कोल्हे
संस्थापक अध्यक्ष अजिज शेख यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता भविष्यात शहरातील महाऑनलाईन केंद्र (सेतु केंद्र) तसेच आधार सेवा केंद्र संचालकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.