पारोळा (प्रतिनिधी) – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार डॉ. हर्षल माने यांनी व्यापारी वर्गाच्या भेटीगाठी घेत, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला.
डॉ. हर्षल माने यांनी या भेटीत गावातल्या समस्या ऐकून घेत त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. पिंपळकोठा खुद्र व पिंपळकोठा बुद्रुक येथील परिसरातील ग्रामस्थांची संवाद साधताना त्यांनी त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि गावातील विकासाच्या दृष्टिकोनातून आपली भूमिका मांडली.
डॉ. हर्षल माने यांच्या या दौऱ्यात गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी गावातील महिलांनी ओवाळून त्यांचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
डॉ. हर्षल माने हे एक सुशिक्षित उमेदवार असून त्यामुळे ग्रामीण भागातील विकास आणि परिवर्तन घडवण्यासाठी ते योग्य उमेदवार असल्याचे ग्रामीण भागातील वर्गाला वाटत आहे. त्यांनी व्यापारी वर्गाला जळगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक ते पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे.