रावेर (प्रतिनिधी) – विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी काल (दि.११) यावल शहर, अंजाळे, वाघळूद या परिसरात आपला प्रचार दौरा काढला.
यावेळी यावल तालुक्यातील यावल शहर, अंजाळे, वाघळूद यासह परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून यावल ते फैजपूर रस्ता डांबरीकरण यावल ते भुसावळ रोडवरील काँक्रीटीकरण व अंतर्गत रस्ते डांबरीकरण,काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक, इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशिर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली.
यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य शेखर पाटील,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हाजी छब्बीर शेठ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुकेश येवले, सर काँग्रेस रावेर लोकसभा कार्याध्यक्ष भगतसिंग बापू पाटील, यावल माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, शिवसेना शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले,काँग्रेस शहराध्यक्ष कदिर खान,हाजी इकबाल खान,माजी नगरसेवक युनूस शेठ,अस्लम मेम्बरं,मनोहर सोनवणे,संतोष खर्चे,पप्पू जोशी,कडू पाटील,विवेक अडकमोल,हसन तडवी,बारी समाज पंच मंडळ अध्यक्ष श्री दगडू बारी,बशीर तडवी,हाजी गफ्फार शहा,संदीप भैय्या सोनवणे,राजेश करांडे,कामराज घारु,बोडदे नाना, अरुण लोखंडे, अजय बढे,विक्की गजरे,व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.