जळगाव (प्रतिनिधी) – भाजपकडून आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून भाजपकडून पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात जळगावचे आमदार सुरेश भोळे राजू मामा यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपच्या या महिला उमेदवारांमध्ये
श्रीयजा अशोक चव्हाण – भोकर
मंदा विजय म्हात्रे – बेलापूर
मनीषा अशोक चौधरी – दहिसर
गोरेगांव – विद्या ठाकूर
माधुरी सतीश मिसाळ – पर्वती
अनराधाताई अतुल चव्हाण – फुलंब्री
सीमाताई महेश हिरे – नाशिक पश्चिम
सुलभा गायकवाड – कल्याण पूर्व
मोनिका राजीव राजले – शेगांव
प्रतिभा पचपुते – श्रीगोंडा
नमिता मुंदडा – कैज
भाजपची पहिली उमेदवार यादी
जामनेर -गिरीश महाजन
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव – अशोक उडके
यवतमाळ – मदन येरवर
किनवट – भीमराव केरम
भोकर – क्षीजया चव्हाण
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड
चिखली -श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुटे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
देवली – राजेश बकाने
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
नागपूर दक्षिण – मोहन माते
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात जामनेर मधून गिरीश महाजन, चाळीसगाव मधून मंगेश चव्हाण यांना उमदवारी जाहीर झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे राजू मामा यांना भाजपकडून उमेदवारी मिळते की नाही ? यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र राजू मामानी केलेल्या कामाची पावती म्हणून आज तिसऱ्यांदा भाजप कडून राजुमामांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.