चाळीसगांव (प्रतिनिधी) – राज्याच्या गृह विभागाने नूतन 12 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाचे अवर सचिव पदी गो. ढाकणे यांनी नुकतेच काढले यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव म्हणून पुण्याच्या पुणे अन्वेषण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह अर्जुन सिंग चंदेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चाळीसगाव नियुक्ती होण्यापूर्वी ते पुणे मुंबई येथे पुणे अन्वेषण विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते राजेंद्रसिंह चंदन यांनी मिळणारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षण म्हणून काम केले आहे मेहुनबारे येथे असताना त्यांनी केलेल्या गुन्हे अन्वेषणाचे आणि पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल कायदा व सुव्यवस्थेचे वरिष्ठांकडून कौतुक झाली होते.
भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले त्यानंतर त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून ओळख त्यांनी मिळाली त्यानंतर त्यांची संभाजी नगर जिल्ह्यातील चापानगर येथे बदली झाली पुढे त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना बीड येथे एलसीबीचा पदभार देण्यात आला. त्यानंतर ते पुन्हा जळगाव जिल्ह्यात आलेत नंतर त्यांनी मुक्ताईनगर जळगाव एलसीबी आणि जामनेर येथे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली त्यानंतर त्यांची पदोन्नती झाली. आता ते पुन्हा जळगाव जिल्ह्यात आले असून चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार.