वाकडी (प्रतिनिधी) – शेतात बकऱ्यांसाठी चारा घेण्यास गेलेल्या १२ वर्षीय महेश अनिल सूर्यवंशी या चिमुकल्याचा शेतात तुटलेल्या वीज तारेचा धक्का लागून जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी वाकडी शिवारात घडली. या घटनेत मुलाचे वडील देखील थोडक्यात बचावले. बापाच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याचा हृदय पिवळटून टाकणाऱ्या या घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावात पोहोचली. सदर घटनेबद्दल सर्वत्र व्यक्त होत आहे.
योगायोगाने त्याचवेळी एका अंत्यविधी साठी आमदार मंगेश चव्हाण हे वाकडी गावात आले होते, आमदार चव्हाण यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंबना करता घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीरे ओळखून त्यांनी उपस्थित वीज वितरण कंपनी व पोलीस प्रशासन यांना सूचित करून घटनेचा पंचनामा केला. सदर प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी माणुसकीचे दर्शन दाखवत, भावनाविवश होत बालकाचा मृतदेह हा चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. या घटनेचा हृदय पिळवटून टाकणारे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाकडी गाव हे आमदार यांच्या मामाचे गाव असल्याने त्यांचे या गावाशी वेगळे नाते आहे. आमदार यांच्या माणुसकीचे दर्शन या निमित्ताने पुन्हा एकदा झाले आहे.
झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून यात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिल्या, महेश च्या दुर्दैवी मृत्यूने सूर्यवंशी कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, जे नुकसान झोके नुकसान न भरून निघणारे आहे. मात्र वीज वितरण कंपनी व शासनाकडून तसेच वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त मदत मयताच्या कुटुंबियांना मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार चव्हाण यांनी दिले.