जळगाव (प्रतिनिधी) – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद येथे जाहीर सभेत दिलेला शब्द पाळून वचनपूर्ती करून – नशिराबाद नगरपरिषदेच्या 60 कोटीच्या भुयारी गटार योजनेस नगर विकास विभागाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रशासकीय मंजुरी दिली असल्याने या कामाची तातडीने टेंडर काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेमुळे शहरातील सर्व गटारी भुमीगत होवून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रियेचा प्रश्न कायमचा निकालात निघणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नशिराबादच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून भरघोस निधी मंजूर करून केल्यामुळे पदाधिकारी व नागरिकांनी ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे. तर बस स्थानक परिसरात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोषही करण्यात आला.
शहराचा विस्तार मोठय़ा प्रमाणात झाला असला, तरी सांडपाणी विल्हेवाटीचा प्रश्न होता. शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडण्यात येत असल्याने त्यासाठी शहरात भुयारी गटार योजना राबवणे गरजेचे होते. नगर परिषद प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यानुसार मुंबई येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मा. प्रधान सचिव (नवि-2) यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची बैठकीत नशिराबाद नगरपरिषदेच्या 60 कोटी रक्कमेच्या भुयारी गटार योजनेस मान्यता देण्यात आली होती त्यानुसार शासनाच्या नगर विकास विभागाने शासन निर्णय जारी करून नगरोत्थान महाअभियान अंतर्गतनशिराबाद शहराच्या मल नि:स्सारण प्रकल्पास प्रशाकीय मान्यता देण्यात आली असून सदर प्रकल्पाचे कार्यान्वयन नशिराबाद नगरपरिषदे मार्फत करण्यात येणार आहे
शहर भुयारी गटार योजना
पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद करांना दिलेला शब्द पाळला असून नशिराबाद करांसाठी भुयारी गटार योजना मंजुर करुन आणलेली आहे. सदर योजनेमुळे शहरातील सांडपाणी भुमीगत गटारीव्दारे संकलीत करुन सांडपाणी प्रकल्पाव्दारे (STP) प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात निर्माम होणाऱ्या डासांचे प्रमाण कमी होऊन रोगराई वर मात करता येईल. सांडपाणी वाहून नेणाऱ्या अंतर्गत पाईपलाईन (48.46किमी), 5MLD क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP), पंपिंग मशिनरी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) पंपिंग मशिनरी, 123KWH क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, इतर अनुषंगिक तांत्रिक बाबीचा समावेश आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नशिराबादला नवीन वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री
नशिराबाद हे जळगाव तालुक्यातील सर्वात मोठे शहर असून ते कधी काळी खूप मोठी बाजारपेठ होती. ब्रिटीश काळात नशिराबादला जळगावपेक्षा जास्त महत्व होते. काळाच्या ओघात जळगाव प्रगतीत खूप पुढे निघून गेले तरी नशिराबाद हे खूप मोठे व महत्वाचे शहर मानले जाते. आपण नशिराबादचा कायापालट करून दाखवू असे अभिवचन दिलेले आहे. शासनाच्या नगरविकास माध्यमातून नशिराबदला नवीन वैभव प्राप्त करण्यासाठी विकास कामांसाठी शासन स्तरावरून व जिल्हा नियोजन मधून भरघोस निधी मंजूर केला असून काही कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगती पथावर आहेत. नशिराबादला नवीन वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील,माजी सरपंच विकास पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील (पिंटुशेठ), शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, युवासेना शहरप्रमुख चेतन बराटे, भाजपा शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किरण पाटील, निळकंठ रोटे, शेख अहमद शेख सत्तार, पराग देवरे, गणेश देशमुख, कैलास सोनवणे, संतोष पवार, भूषण माळी, बन्सी माळी, अनिल देवरे, अशोक व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष केला.