रावेर (प्रतिनिधी) – रसलपुर येथे जुगार खेळणा-या पत्ताच्या क्लबवर उपविभागीय अधिकारी तथा आयपीएस अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने छापा टाकत तेरा जणांना जुगार खेळतांना ताब्यात घेतले आहे. तर अनेक जुगा-यांनी पोलिसांचा छापा पडल्याचे बघून घटनास्थळावरुन पळ काडला. या पडलेल्या छाप्यात एकूण पाच लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे जुगार सट्टा व पत्ते खेळणा-यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याचे सविस्तर वृत्त असे की फैजपुर उपविभागीय अधिकारी तथा आयपीएस अन्नपूर्णा सिंग यांना रावेर ते रसलपुर रस्त्यावर एका घरामध्ये झन्ना मन्ना म्हणजे जुगार खेळणाच्या पत्ता क्लब सुरु असल्याची माहीती मिळाली. माहीतीच्या आधारे आयपीएस अन्नपूर्णा सिंग यांनी स्वता:च्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल पाटील व पोलिस कर्मचारी अनिल इंगळे, सुमित बाविस्कर यांना छापा टाकण्यासाठी रावेरात पाठवले यावेळी रावेर पोलिस स्थानकाचे काही कर्मचारी सोबत घेऊन घटनास्थळी छापा टाकण्यात आला.
यावेळी काही जुगारी गोल राऊंड मांडून झन्ना मन्ना मांग पत्ता खेळत असल्याचे दिसले पोलिसांची जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळा वरुन १६ मोटरसाइकल, ८ विविध कंपनीचे मोबाईल, व १७ हजार रोख जप्त करण्यात आले व पत्ता खेळणारे जुगारी मुस्ताफा नामदार तडवी (रमर्जीपुर ता. रावेर,गणेश छगन पवार (अभोडा तांडा ता रावेर)जुबेर रफीक शेख (इमामवाडा रावेर) फिरोज जुम्मा तडवी (जिन्सी आभोडा, रावेर) सलीम बाबु तडवी (अभोडा ता. रावेर)आदिलखान सलीमखान (इमामवाडा रावेर) समाधान सोमा महाजन(रसलपुर ता. रावेर) किसन फरशी पवार (अभोडा ता. रावेर)सतीष रामदास शिरतुरे (सिध्दार्थनगर रावेर) अल्ताफ रशीद खान (भोईवाडा रावेर)सुधाकर दयाराम महाजन (जुना सावदारोड रावेर) रमजान सुपडू तडवी (रसलपुर ता. रावेर)शुभम रामभाऊ महाजन यांना ताब्यात घेण्यात आले असून रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.