जळगाव (प्रतिनिधी) – भरारी फाउंडेशन आयोजित खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण
ठरलेला बहीणाबाई महोत्सव २०२४ याचे नवव्या वर्षाचे आयोजन २५ ते २९ जानेवारी सागर पार्क येथे ठिकाणी करण्यात आले आहे यावर्षीच्या बहीणाबाई महोत्सवाचे नववे वर्ष असून पाच दिवस या महोत्सवाचे आयोजन होत आहे.
बचत गटातील महिलांना हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी व त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व्हावी याकरिता गेल्या आठ वर्षापासून बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन होत आहे. नवव्या वर्षामध्ये आयोजित होत असलेल्या बहिणाबाई महोत्सवात १५० महिला बचत गटानी सहभाग घेतला असून या महोत्सवात महिलांनी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व अस्सल खान्देशी खाद्य पदार्थांचा खाद्य महोत्सव या बहिणाबाई महोत्सवात आयोजित होत आहे. महिला बचत गटा सोबतच जळगाव जिल्ह्यातील लघु उद्योगानी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व प्रसिद्धी करण्यासाठी भारत सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विभागाच्या वतीने विशेष स्टॉल लावण्यात येणार आहे.
भव्य प्रवेशद्वार
२२ जानेवारी रोजी संपूर्ण भारतभर राममंदिर स्थापना उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाचे औचित्य साधून या वर्षी बहिणाबाई महोत्सवाचे मुख्य आकर्षण आयोध्या येथील स्थापन होत असलेल्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती बहिणाबाई महोत्सवाच्या अग्रस्थानी असणार आहे. खान्देश पर्यटन चित्रप्रदर्शनी बहिणाबाई महोत्सवात २५ ते २९ जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने खान्देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक स्थळांची माहिती देणारे खान्देश पर्यटन चित्र प्रदर्शनी व कलादालन या महोत्सवात असणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम
खान्देशची संस्कृती व लोककलेचा उत्सव हे ब्रीद घेऊन नवव्या वर्षात पदार्पण केलेल्या बहिणाबाई महोत्सवातील या वर्षीचा सांस्कृतिक जागर देखील विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे. यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले (जालना) यांचा ३५०वा शिवराज्याभिषेक दिन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित गर्जा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम होणार आहे, आपल्या सुंदर आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना भुरळ घालणारा सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रिकामे (नाशिक) यांचा भावगीत व लोकगीतांचा कार्यक्रम असणार आहे. जळगावच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्य दिग्दर्शिका डॉ अपर्णा भट यांचा रामायणावर आधारित सेतू बांधा रे हि नृत्य व संगित नाटिका तसेच खान्देशा सह संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला प्रवीण माळी यांचा अहिराणी एकपात्री कार्यक्रम आयत पोयत संख्यान व प्रजासत्ताक दिनी एक शाम देश के नाम हा मराठी हिंदी देशभक्ती गीतांचा विशेष कार्यक्रम या वर्षीच्या महोत्सवात आयोजित करण्यात आलेला आहे.
बहिणाबाई पुरस्कार २०२४ जाहीर
फाउंडेशन आयोजित खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या महत्वपुर्ण ठरलेला बहीणाबाई महोत्सव २०२४ याचे नवव्या वर्षाचे आयोजन २५ ते २९ जानेवारी बॅ. निकम, सागर पार्क, जळगांव या ठिकाणी करण्यात आले आहे. यावर्षीच्या बहीणाबाई महोत्सवाचे नववे वर्ष असून पाच दिवस
होत्सवाचे आयोजन होत आहे. दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, देशसेवा, कला, साहित्य, लोककला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवातील नवव्या वर्षाचे बहिणाबाई पुरस्कार २०२४ आज जाहीर करण्यात येत आहे. या वर्षीच्या पुरस्कारात सामाजिक, शैक्षणिक उद्योग, वैद्यकीय, कला साहित्य लोककला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८ व्यक्तींना बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यांना दिला जाणार बहिणाबाई पुरस्कार
बहिणाबाई पुरस्कार २०२४ यावर्षी सुनील भोकरे चाळीसगाव जि.जळगाव (देशसेवा), डॉ गणेश चंदनशिवे मुंबई (लोककला), डॉ.गिरीश सहस्त्रबुद्धे जळगाव (वैद्यकीय), डॉ. प्रीती अग्रवाल जळगाव (शैक्षणिक), मनीषा घोलप नाशिक
(महिला सक्षमीकरण), अर्चना जाधव जळगाव (उद्योग व कौशल्य विकास), अनिल कोष्टी भुसावळ जि. जळगाव(नाट्य), नामदेव कोळी जळगाव (साहित्य), यांना या वर्षीचा मानाचा बहिणाबाई पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात येणार आहे.