पारोळा प्रतिनिधी : सध्याची परिस्थिती पाहता आपण अतिशय बिंदासपणे जगत असतो आपल्या घरात मौल्यवान वस्तू सोने नाणे पैसे असे जरी ठेवले असले तरी आपण त्याची चावी त्या घराला लागूनच तुळशीमध्ये खिडकी मध्ये ठेवलेली असते आणि सराईत चोर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून असून ते याचाच फायदा घेत दिवसा चोरी करतात. दिवसा चोरी करायला लागलेत.
तसेच काही मुली जेव्हा कॉलेजला शाळेला जातात त्यावेळेस त्या चुकीच्या मुलांच्या नादी लागून नको ते निर्णय घेऊन कुटुंबाला अडचणीत आणण्याचे काम करतात म्हणून महिलांनो तुम्ही सतर्क आणि जागृत असलं पाहिजे जेणेकरून आपल्या कुटुंबावरती असा कोणताही आघात होणार नाही असे प्रतिपादन पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी केले ते पारोळा येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीचा मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य महिला अध्यक्ष कल्याणी देवरे,युवती तालुकाध्यक्ष कुसुम बाविस्कर,शिरसोदे येथील महिला शाखाप्रमुख वनिता संदाशिव, युवती शाखाध्यक्ष हर्षाली पाटील,
कोळपिंप्री येथील महिला शाखा प्रमुख रत्नाबाई पाटील,युवती संपर्क प्रमुख प्रिती पाटील,कंकराज येथील महिला शाखाप्रमुख कविता पाटील, युवती शाखाध्यक्ष आशा पाटील,महाळपुर येथील महिला शाखाप्रमुख संगिता पाटील,युवती शाखाध्यक्ष अश्विनी पारधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषेत सांगितले की ज्या पद्धतीने लोकशाहीला चार आधारस्तंभ आहेत अगदी त्याच पद्धतीने आपल्या कुटुंबालाही चार आधारस्तंभ आहेत ज्यात कुटुंबप्रमुख त्यांची पत्नी त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी यांना जर का योग्य वेळी योग्य मार्गदर्शन लाभले नाही किंवा योग्य आर्थिक नियोजन झाले नाही तर ही कुटुंब व्यवस्था अस्ताव्यस्त होऊन कुटुंब विकोपाला जाते म्हणून घरातल्या प्रत्येक सदस्याने दोन पैसे उत्पन्न कसे मिळेल त्यासाठी काय केले पाहिजे हे शोधले पाहिजे आणि आम्ही संघटनेच्या माध्यमाने ह्या माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचं काम करणार आहोत असे सांगितले.
राज्य महिला अध्यक्ष कल्याणी देवरे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की महिलाही घराची लक्ष्मी असून तिच्या सहकार्यानेच कुटुंबामध्ये लक्ष्मी प्राप्त होते म्हणून तिला मान सन्मान आणि रोजगार मिळाला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे तालुका युवती अध्यक्ष कुसुम बाविस्कर यांनी केले तर सूत्रसंचालन तालुका युवती संपर्क प्रमुख रक्षा बिराडे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने महिला व युवती उपस्थित होत्या.