सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. सेंट्रल बँकेने सब-स्टाफ पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज कशा पद्दतीने करावा व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हे जाणून घेऊयात
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीद्वारे केली जाईल. पहिली परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल आणि उमेदवाराला स्थानिक किंवा प्रादेशिक भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. असे झाले तरच ते अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, SC, ST, PWBD आणि महिला उमेदवारांना 175 रुपये शुल्क भरावे लागेल. तर इतर सर्व उमेदवारांसाठी 850 रुपये शुल्क आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024. परीक्षा (Online): फेब्रुवारी 2024 या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी म्हणजेच SSC किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा :18 ते 26 वर्षे असे आहे.