नंदुरबार : तालुक्यातील आडर्डीतारा ते वेडापावला गावादरम्यान भरधाव वेगातील मोटारसायकल पिकअप शेडला ठोकली गेल्याने दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला, वेडापावला येथील अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेणारा १६ वर्षीय विद्यार्थी सोमवारी दुपारी मोटारसायकलीने आडर्डीतारा गावाकडे जात होता. दरम्यान, नटावद फाट्याजवळ त्याचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल पिकअप शेडला ठोकली गेली होती. यात गंभीर जखमी झाल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी आश्रमशाळेचे कर्मचारी संजय रमेश पाटील यांनी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयत १६ वर्षीय विद्यायांविरोधात स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक जगन तलवी करीत आहेत