गोलंदाजी करताना झालेल्या दुखापातीनंतर हार्दिकला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून मुकावे लागले होते. मात्र, अफगाणस्तानविरुद्धच्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्याचे खेळणे अपेक्षित होते, परंतु, पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तो या मालिकेपर्यंत तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे.
११ ते १७ जानेवारी २०२४ दरम्यान भारत- अफगाणिस्तान मालिका होणार आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी ही भारताची शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. पण, सूर्यकुमार व हार्दिक हे दोघेही या मालिकेत खेळणार नसल्याने टीम इंडियाचा कर्णधार कोण, हा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे असेल.
तसेच, हार्दिक पांड्या आयपीएल २०२४च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याचेही वृत्त आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे आणि मुंबई इंडियन्सचे नेतृत्व पुन्हा रोहित शर्माकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहितने टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे, पण, कर्णधारपद मिळेल तरच खेळेन, ही अट रोहितने ठेवली असल्याचे बोलले जाते आहे. सद्य:स्थिती पाहता रोहितकडे नेतृत्व जाऊ शकते. मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या काही सामन्यांतही रोहित नेतृत्व करताना दिसू शकतो,
सूर्यकुमार यादवही शर्यतीत २०२४ च्या आयपीएलसाठी गुजरातकडून ट्रेड केलेल्या हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपविण्याचा निर्णय मुंबई इंडियन्स फ्रचायनीकडून घेण्यात आला होता. अनेक चाहत्यांना हा निर्णय पटला नसला तरी मुंबई इंडियन्स संघातील एकाही खेळाडूने याबाबत अधिकृतपणे मत प्रदर्शित केले नव्हते.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फ्रँचायझीने अशाप्रकारे नेतृत्व काढून घेतल्यानंतर पुन्हा त्या भूमिकेत जाण्यासाठी रोहित शर्मा नकार देऊ शकतो, स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी हिटमॅनकडून कदाचित हा निर्णय घेतला जाईल. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर टाकली जाऊ शकते.