आपण चांगली नोकरी करावी यासाठी कित्येक जण दिवसरात्र मेहनत करत असतो. अशातच जर तुम्ही १०वी पास असणार तर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये इंडियाचे सब स्टाफ अर्थात सफाई कर्मचारी या पदांसाठी अर्ज करू शकता. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी तुम्ही ९ जानेवारी २०२४ किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकता.
या भरतीअंतर्गत, स्वच्छता कर्मचारी म्हणून उपकर्मचाऱ्यांच्या एकूण ४८४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे. सेंट्रल बँकेत अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा
३१ मार्च २०२३ रोजी १८ ते २६ वर्षे दरम्यान असावी. याशिवाय सरकारी नियमांनुसार वयातही सवलत दिली जाणार आहे. अर्जाची फी उमेदवारांच्या श्रेणीनुसार बदलते. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १७५ रुपये भरावे लागतील तर इतर सर्व उमेदवारांना ८५० रुपये भरावे लागतील. या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीच्या आधारे केली जाईल. या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा जानेवारी/फेब्रुवारी २०२४ मध्ये होणार आहे.