महाराष्ट्र राज्यात थंडीचा जोर वाढायला सुरुवात झाली असून यामुळे अनेकांना सर्दी खोकला या सारखे आजार होत असतात बहुतेक वेळा अँटीबायोटिक्स आणि कफ सिरप घेऊनही सर्दी खोकल्यापासून आराम मिळत नाही. घरच्या घरीच तुम्ही सर्दी-खोकला बरा करण्यासाठी काही घरगुती उपचार करू शकता जेणेकरून तुम्हाला लवकर बरे वाटण्यास मदत होईल.
हळदीचे पाणी – हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-सेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे संक्रमण दूर करण्यास मदत करतात. आलं आणि तुळस – हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुळशी आणि आल्याचा चहा खूप फायदेशीर मानला जातो. काळी मिरी आणि मध – काळी मिरी आणि मध देखील घसादुखी आणि खोकल्यामध्ये खूप फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संक्रमण दूर करण्यात मदत करतात. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही जर या घरगुती पदार्थांचा वापर केला तर तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल. त्याचबरोबर, या गोष्टींचा साईड इफेक्ट होत नाहीत पण त्रास वाढत राहिला तर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.