दिवसेंदिवस महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. तसेच आपण आजारी पडलो तर लगेच आपल्याला दवाखान्यात जावे लागते. दवाखाना म्हटलं कि डोळ्यासमोर मोठा खर्च उभा राहतो. पण तुम्हाला माहित आहे का कि मोफत सेवा देणारे डॉक्टर अस्तित्वात आहेत. आणि हे डॉक्टर तुम्हाला आरोग्यही देतात तर हे डॉक्टर नैसर्गिक आहेत. तर ते कोणते हे आपण जाणून घेऊयात.
सूर्य
सकाळचे कोवळे ऊन आपल्या शरीरासाठी चांगले असते. या कोवळ्या उन्हातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळत असते. जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे असते.
व्यायाम
निरोगी शरीरासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. डॉ नेहमी आपल्याला व्यायाम करण्याचा सल्ला देतात. चालणे, धावणे, सायकल चालवणे यासारखे रोज वेगवेगळे व्यायाम केलेत तर व्यायाम करण्याचा कंटाळा येणार नाही. व्यायाम करण्याने आपण सुदृढ राहतो.
आहार
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण दररोज सात्विक आहार घेतला पाहिजे. आहारातून ऊर्जा मिळते. कडधान्य, पालेभाज्या, फळे यासारखे सात्विक आहार आपण घेतला पाहिजे. यामुळे आपल शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होईल.
विश्रांती
चांगल्या आहारासोबत चांगली विश्रांती देखील महत्वाची आहे. पुरेशी झोप घेणे हे आपल्या आरोग्यसाठी खूप महत्वाचे आहे. दररोज किमान ८ तास झोप घेणे गरजेचे आहे.