पारोळा प्रतिनिधी (ता.१२): ज्या पद्धतीने मनुष्य प्राण्याला जगण्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा लागतो अगदी त्याच पद्धतीने आम्हा शेतकऱ्यांना शेतीसाठी बीज भांडवल, जलसिंचन व हमीभावाची गरज आहे बाकी तर होत राहील परंतु आता गरज जलसिंचनाची आहे कारण शेतात जर पाणी खेळलं तर आम्हाला बीज भांडवल पण भेटतं आणि हमीभावा संदर्भात संघटना झटत राहील.
परंतु लोकप्रतिनिधींनी रस्ते, सभा मंडप, गाव कमान, गाव चावडी या कामांची आम्हा शेतकऱ्यांना कुठेही गरज नाही हे देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी कसं जाईल ? पाठचाऱ्या कशा दुरुस्त होतील? बंदपाठचार्या सुरू कशा होतील ? लहान-मोठे बंधारे कसे होतील? आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी कसं खेळेल ?फक्त मक्तेदार पोसण्यासाठी निधी खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपला निधी खर्च करावा.आणि हे सर्व लोकप्रतिनिधी कडून करून घेण्यासाठी आपल्याला शेतकरी म्हणून संघटीत होणे आवश्यक आहे,आणि ते फक्त महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून साध्य करता येईल असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले ते शिवरे दिगर ता पारोळा येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी शाखाध्यक्ष म्हणून समाधन पाटील,कार्याध्यक्ष म्हणून प्रभाकर पाटील,उपाध्यक्ष म्हणून नामदेव पाटील,माहिती प्रमुख म्हणून समाधान बेलेकर, संपर्क प्रमुख म्हणून रवींद्र पाटील, खजिनदार म्हणून विजय पाटील,महासचिव म्हणून महादेव पाटील सचिव म्हणून भाऊसाहेब सरदार, प्रसार माध्यम प्रमुख म्हणून योगेश पाटील, सल्लागार म्हणून नितीन कदम,जेष्ठ मार्गदर्शक म्हणून संदेश बेलेकर,आरोग्य प्रमुख म्हणून राजेंद्र पाटील सदस्य म्हणून गोविंदा पाटील, भुराजी पाटील, निंबा पाटील, धनंजय कांडेकर, ईश्वर पाटील, राजेंद्र सरदार, ज्ञानेश्वर पाटील, उमेश पाटील, प्रवीण बेलेकर यांची श्री देवरे यांनी नियुक्तीपत्र देऊन यांची नियुक्ती करण्यात येऊन गावात संघटनेची शाखा स्थापन केली.
यावेळी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे,डोंबीवली येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बेलेकर हे उपस्थित होते,हे तर गावातील यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र बेलेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार समाधान पाटील यांनी मांडले.