जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील भुसावळ येथे स्पोर्टस शोतोकान कराटे Do असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे दिनांक १० सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या नॅशनल ऑल स्टाईल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पारोळा येथील शाओलीन कुंग फू इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळविले आहे.
यामध्ये विजयी स्पर्धकांचे नाव याप्रमाणे 1) चेताली प्रभू नरवाले गोल्ड मेडल, 2) निशिका नरेश नरवाले सिल्वर मेडल, 3) वैष्णवी कुशल भोई सिल्वर मेडल, 4) नियती चेतन नरवाले सिल्वर मेडल, 5) जिविका विशाल नरवाले ब्रांज मेडल, असिस्टंट ग्रँड मास्टर सिफू V सुरेंद्रन यांच्या दिशानिर्देश नुसार वरिष्ठ इंस्ट्रक्टर मा शरद नरवाले व मा सचिन भोई यांनी विद्यार्थ्यांकडून स्पर्धेचा सराव करवून घेतला.
विजेत्या स्पर्धकांचे ग्रेट ग्रँड मास्टर सिफु इंद्रजीत चीफ इन्स्ट्रक्टर & चीफ एक्सामिनर शाओलिन कुंग फू इंटरनॅशनल, यांच्यासहित सर्व इंस्ट्रक्टर व पारोळा शहर तसेच परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.