जळगाव (प्रतिनिधी) – युवा सेना जळगाव महानगर तर्फे यावर्षी निष्ठा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी प्रसंगी देण्यात येणाऱ्या ट्रॉफी चे अनावरण युवा सेना प्रमुख तथा राज्याचे माजी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले.
७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन या वर्षी युवा सेना जळगाव महानगर तर्फे करण्यात येत आहे याची तयारी अंतिम टप्प्यात असून निष्ठा दहीहंडी ही मोठ्या दिमाखात साजरा करण्याची तयारी आयोजक युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, महानगर समन्वयक महेश ठाकूर, महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे यांनी केली आहे.
निष्ठा दहीहंडीचे हे पहिले वर्ष असून यात शिवगंध ढोल पथक याचे प्रमुख आकर्षण राहणार असून आकर्षक रोषणाई भव्य दिव्य व्यासपीठ हे खास आकर्षण राहणार आहे. तरी शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकां तर्फे करण्यात आले आहे. सदर महोत्सवासाठी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, युवा सेना विस्तारक चैतन्य बनसोडे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा सेना चिटणीस अंकित कासार, सरचिटणीस जय मेहता, शहर युवा अधिकारी गिरीश कोल्हे, उपमहानगर अधिकारी अजिंक्य कोळी, ओम कोळी, निलेश जोशी, पंकज जोशी, मयूर गवळी इत्यादी परिश्रम घेत आहे.