जळगाव – आज शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर जळगाव जिल्हा युवक काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे मनोहर कुलकर्णी म्हणजेच भिडे गुरुजी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अवमानकारक केलेल्या बेतल वक्तव्याच्या निषेधार्थ भिडे गुरुजी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.
जनहिता करता आम्ही आंदोलन केल्यास आमच्यावरती गुन्हे दाखल करतात, परंतु राष्टपितांच्या बद्दल व नेहमीच बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरुजीला मात्र अजून मोकळेच सोडलेले आहे.
युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आंदोलन करतेवेळी सांगितले की, देशामध्ये विरोधी पक्ष म्हणून जनहितासाठी जेव्हा काँग्रेसचा कार्यकर्ता आंदोलन करतो तेव्हा मात्र सत्तेत असलेला भाजप पक्ष त्यांच्यावर ती गुन्हे दाखल करतात, परंतु नेहमीच वेगवेगळी बेताल वक्तव्य करणारे भिडे गुरुजी व आता थेट भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दलच अवमानकारक बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरुजींना मात्र मोकळेच सोडलेले दिसून येत आहे.
मनोहर कुलकर्णी या व्यक्तीने प्रथमतः संभाजी महाराजांचे नाव लावू नये व त्यांना कुठलाही अधिकार नाही. या मनोहर कुलकर्णी नावाच्या बिनडोक व्यक्ती वरती भाजप पक्षाने तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने याच्या पेक्षाही अधिक त्रिवतेचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी महानगर अध्यक्ष श्याम तायडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष जाकिर बागवान, मा. प्रदेश सचिव मुक्तदिर देशमुख, जगदीश गाढे, प्रदीप सोनवणे, गोकुळ चव्हाण, मीराताई सोनवणे, सुमन मराठे, मीनाताई जावळे, रवींद्र चौधरी, राहुल भालेराव मालोजीराव पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..