जळगाव (प्रतिनिधी) – शहर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा जोरदार प्रचार सुरु असून शहरातील पिंप्राळा हुडको, दुध फेडरेशन, नविन पिंप्राळा, ख्वाजा नगरी, सिद्धार्थ नगर, भुमी नगर, सोनी नगर परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी परिसरातील असंख्य लाडक्या बहिणींनी डॉ.अश्विन सोनवणे यांचे औक्षण करून परिसरातील विविध समस्या मांडल्या.
गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळत असून, “शहराला हवा चेहरा नवा, डॉ.अश्विन सोनवणे तुम आगे बढो च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. शहरातील प्रत्येक गल्लीतून त्यांच्यासाठी समर्थन मिळत असून प्रचार रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतांना दिसत आहेत. शहराच्या विविध परिसरात डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या प्रचार रॅलीत नागरिकांचा जोश, कार्यकर्त्यांचा उत्साह वातावरणात नवी चैतन्याची लहर दिसून आली.
या परिसरातील काही नागरिकांनी परिसरात असलेल्या विविध समस्या डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्याकडे मांडल्या यावेळी डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी शहरात आगामी काळात प्रत्येक गल्लीत विकासाची गंगा आणेल असा विश्वास व्यक्त केला आहे.