रावेर (प्रतिनिधी) – रावेर – यावल विधानसभा मतदारसंघात आता प्रचाराची रणधुमाळी जल्लोषात सुरु झाली असून, प्रचार फेऱ्यांनीही वेग घेतला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांनी आज (दि.१०) तामसवाडी, बोरखेडा प्र. रावेर, शिंदखेडा, मुंजलवाडी, सावखेडा बु., सावखेडा खु., कळमोदा या भागात प्रचार फेरी काढत ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून मुंजलवाडी, ते कुसुंबा रस्ता, मुंजलवाडी ते उतखेडा फाटा रस्ता, सावखेडा लोहारा रस्ता डांबरीकरण, बसस्टँड, सावखेडा बु. खु. कळमोदा फैजपूर रोडवर पूल बांधकाम करणे, गावाला जोडणाऱ्या पुलाला पण प्रशासकीय मान्यता मिळाली आहे , जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना व अंतर्गत रस्ते, काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक आदी मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत.
पुढे ते म्हणाले की, रावेर – यावल परिसरात औद्योगिक विकास करुन इथल्या तरुणांना रोजगार मिळावा, यातून त्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशिर्वाद द्यावा.
या प्रचार फेरीत रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, रावेर शहर माजी नगराध्यक्ष हरिषशेठ गणवाणी, गोटू शेठ, योगेश पाटील, दिलरुबाब इकबालखा तडवी, राहुल जिजाबराव पाटील, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष दीपक महाजन, निळकंठ चौधरी, राजूदादा सवर्णे, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपानकाका पाटील, युवराज महाजन, पुंडलिक पाटील, अनिल पाटील, मैत्रिल पाटील, चेतन पाटील, योगेश पाटील, नितीन पाटील, गणेश पाटील, अमोल शेंनगे, सोपान साहेबराव पाटील, सुधाकर पाटील, संतोष पाटील, गणेश बोरनारे, संतोष पाटील, प्रमोद पाटील, ईश्वर पाटील, किरण पाटील, प्रतीक पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.