चाळीसगाव (प्रतिनिधी) – तुम्ही ५वर्ष आमदार, ५ वर्ष खासदार असतांना कोणतं असं शाश्वत काम केलं आहे? स्वताला उच्चशिक्षित म्हणून स्वताचाच उदोउदो करत फिरतात मग उच्चशिक्षित पणाला शोभेल असा कोणता विकास केला आपण? हे सांगावं अगोदर जनतेला मग आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यावर टीका करावी अशा शब्दांत भाजपा सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी विरोधकांची खरडपट्टी केली आहे.
चाळीसगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. गणित नगरी, कन्नड घाटाचे बोगदे,बलुन बंधारे, नदी सुशोभीकरण आणि असे बरेच आश्वासनांचे दिखावे मतदारांना दाखवण्यात आले होते. माजी लोकप्रतिनिधींकडून परंतु प्रत्यक्षात १० वर्ष पदांवर असून देखील कोणताही विकास करु शकले नाही, पण कत्तलखाना आणण्याचे काम मात्र त्यांनी खुप तातडीने केले होते. पण स्वताच्या नावाने सांगण्यासारखे ठोस असे कोणतेच काम माजी खासदार करु शकले नाहीत म्हणून लोकसभा निवडणुकीत ते स्वतः न लढता दुसऱ्यांना पुढे करुन सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता, पण जनतेने त्यांना सपशेल नाकारले आहे. आणि इतका अपमान होऊन देखील दोन हाणा पण मला बाजीराव म्हणा या गुर्मीत ते वावरत असतात असं देखील अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांना सुनावले.
महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण हे वारकरी पुत्र असून त्यांनी कधी नव्हे इतका निधी चाळीसगाव तालुक्यासाठी आणला आहे. मंगेश चव्हाण हे विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून आजपर्यंत एकही आरोप त्यांच्यावर झालेला नाही. कोरी पाटी आणि विकासाचं व्हीजन असल्याने आमदार मंगेश चव्हाण हे प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती साहेबराव राठोड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.