चाळीसगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाचा तालुकास्तरीय निर्धार मेळावा काल गौताळा पार्क येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, भाजप आमदार मंगेश चव्हाण , भाजपा सह मुख्यप्रवक्ते अजित चव्हाण, राष्ट्रवादी प्रवक्ते योगेश देसले यांच्यासह जिल्हा व तालुक्या भरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाडकी बहीण योजना सारख्या दमदार योजना हे केवळ महायुती सरकारच राबवू शकते, त्यासाठी पुन्हा राज्यात महायुतीची सत्ता येणे गरजेचे आहे. अजित दादा पवार यांच्यासारखे कार्यतत्पर नेतृत्व महायुतीला लाभल्याने फक्त मतदारसंघाचा विकासासाठी भरीव निधी उपलब्ध होतो. महायुतीचा घटकपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, शिवसेना, रिपाई (आ) आदी पक्ष देत असलेले योगदान महत्त्वाचे असून ते लक्षात घेत येणाऱ्या काळात सर्व निवडणुकीत योग्य तो सन्मान दिला जाईल असे आश्वस्त केले व अधिक जोमाने प्रचारासाठी लागण्याची विनंती केली.