जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला विभाग जिल्हाध्यक्षपदी कल्पना शांताराम पाटील यांचे नियुक्ती करण्यात आली आहे, त्याबाबतचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी कल्पना पाटील यांना दिले आहे.
पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच महिलांवरील होणाऱ्या अत्याचार विरोधात लढणे , महिलांच्या विकासासाठी कार्यरत राहून शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवणे असे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले आहे त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.