जळगाव (प्रतिनिधी) – पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल केल्याच्या रागातून अथर्व कॉलनीत राहणाऱ्या महिलेला फोनवरून घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी २६ जुलै रोजी समोर आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे आहे की , शहरातील अथर्व कॉलनीत भाजपच्या महिला पदाधिकारी रेखा पाटील या वास्तव्याला आहे. पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल केल्याच्या रागातून सुवर्ण कृष्णा पाटील यांनी फोन द्वारे जीवेठार मारण्याची धमकी दिली.
सुवर्णा कृष्णा पाटील व जेनेरिगेशन चे कर्मचारी कृष्णा पाटील राहणार (संत मीराबाई नगर) , बहीण वंदना अजय पाटील, शाळेचे शिक्षक अजय पाटील यांच्याविरुद्ध कायद्यानुसार पोस्कोचा गुन्हा दाखल केला गेलेला आहे. त्याचा राग मनात ठेवून काही कारण नसताना शुक्रवारी २६ तारखेला दुपारी ३.oo – ३.३० च्या दरम्यान मध्ये रेखा पाटील या महिलेच्या मोबाईलवर कॉल करून सावकारी करणाऱ्या चौघांनी शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच रेखा पाटील यांच्या नातेवाईकांना भेटून आणि फोनवरून त्यांच्या विषयी वाईट गोष्टी सांगून बदनामी केली.
हा त्रास सहन न झाल्याने महिलेने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून या चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.