पारोळा (प्रतिनीधी) – मुळची एरंडोल येथील भुमीपुत्री व सतत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली जयश्री संतोष महाजन हिचे सामाजिक , शैक्षणिक , कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या एरंडोल तालुक्यासाठी युवती तालुकाध्यक्ष पदी जयश्री महाजन हिची आज नियुक्तीपत्रा व्दारे नियुक्ती केली.
शेतकऱ्यांना विशेष करून शेतकऱ्यांच्या लेकींना विविध प्रकारच्या अडचणी येत असतात व त्यांना न्याय देण्याचे कार्य जयश्री महाजन यांनी तालुक्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेला मजबूत करण्यासाठी व शेतकरी वर्गाला संघटनेच्या एका छताखाली एकत्र आणून संघटनेचे ध्येय धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी , कष्टकरी , युवक-युवती , कामगार वर्गापर्यंत पोहचवून संघटना मजबूत करणे व मदत करणे अभिप्रेत असल्याचे नियुक्ती पत्राद्वारे सांगितले आहे.
नियुक्तीपत्र महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या मुख्य कार्यालयात संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मृद व जलसंधारण समिती तालुकाध्यक्ष एस झेड पाटील , कायदा व सुव्यवस्था समितीचे तालुकाध्यक्ष दिलिप पाटील , हणमंतखेडे वि.का.सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील , एरंडोल चे व्यापारी संतोष महाजन , संजय महाजन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र महाजन , निकिता महाजन उपस्थित होते.