जळगाव (प्रतिनिधी) – भाऊच्या स्मरणार्थ संत ज्ञानेश्वर शाळेला एल. ई. डी. प्रोजेक्टर भेट देऊन महाजन कुटुंबिय व त्यांच्या मुलानी एक अनोखा पायंडा घालुन दिला आहे.
शिक्षणा प्रती आपल्या स्व.भाऊने दाखविलेली प्रगल्भता पाहुन भाऊच्या स्मरणार्थ होतकरू विद्यार्थ्याना शिक्षण घेताना हातभार लावावा यासाठी हे प्रोजेक्टर भेट देण्यात आले.
मेहरूण गावातील स्व. धीरज प्रदीप महाजन यांचे अपघाती आजाराने १९ जुन रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्युने महाजन कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला होता. या दुखातुन सावरुन आपल्या भाऊची आठवण कायम रहावी व समाजात एक अनोखा पायंडा घालुन देण्याच्या उद्देशाने स्व. धिरज महाजन यांच्या 22 व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून महाजन कुटुंबियांच्या मुलांच्यावतीने परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाला एलईडी प्रोजेक्टर भेट देण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी महाजन कुटुंबियांचे आभार मानले. या प्रसंगी उपशिक्षिका शितल कोळी व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.