रायगड | प्रतिनिधी – नाईट शिफ्टला जाणाऱ्या चार जणांना भरधाव टेम्पो ने उडवले. या अपघातात दोन जणांचा जागेस मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. १० जून २०२४ रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
सविस्तर माहिती अशी की , रवींद्र धोंडीबा ढेबे आणि सचिन शिवाजी ढेबे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान मयत रवींद्र आणि सचिन हेच संतोष ढेंबे आणि निलेश ढेंबे यांच्यासोबत नाईट शिफ्ट साठी रस्त्यावरून पायी चालत कामाला निघाले होते. त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पो ने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की, रवींद्र आणि सचिनचा जागीच मृत्यू झाला. तर संतोष आणि निलेश जखमी झाले त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जळगावच्या रुग्णालयात दाखल केले. तर, मयत तरुणांचे मृतदेह सविच्छेदनासाठी महाशक्ती असोसिएशनच्या रुग्णवाहिकेत बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक चंदनाबेन रामकुमारला रा. उत्तर प्रदेश टेम्पोसह ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.