जळगाव (प्रतिनिधी) – लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, वैजनाथ, खेडी, कढोली, दापोरी, रवंजे बु, रवंजे खु, खर्ची खु, खर्ची बु, रिंगणगाव, सावदा व विखरण परिसरातील प्रचार दौरा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचा प्रमुख उपस्थितीत पार पडला. या भागातील मतदारांनी त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत देखील केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, भाजपचे जळगांव लोकसभा निवडणुक प्रमुख डाॕ.राधेश्याम चौधरी, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, शिवासेना एरंडोल तालुका संघटक संभाजी आबा पाटील, शिवसेना एरंडोल तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, भाजपा माजी तालुकाध्यक्ष एस.आर.बापू पाटील, एरंडोल शेतकी संघाचे संचालक संभाजी चव्हाण, एरंडोलचे माजी नगरसेवक जगदीश ठाकुर, नीलेश परदेशी, माजी नगरसेविका छाया दाभाडे, सुनिलभैय्या पाटील, मा.पं.स.सदस्य नाना कोळी, शिवसेना शहर संघटक मयुर महाजन, पिंटु राजपुत, शाम ठाकुर, नरेश ठाकरे, प्रवराज पाटील यांचेसह भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते, स्थानिक गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासोचे आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.