जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी परिसरातील मिनाक्षी गोल्ड या चटई कंपनीत काम करणारा परप्रातीय निलेश रामलाल शिलारे वय 29 वर्षे, रा. रामटेक रय्यद जि हरदा म.प्र ह.मु रायपुर कुसुबा जळगाव येतील रहिवासी आहे.
निलेश व त्याचा भाऊ शिवा असे दोघे होळी सणानिर्मीत्त त्यांचे मुळगावी जाणेसाठी दिनांक ९ मार्च रोजी रेमंड चौफुली येथुन रेल्वे स्टेशन येथे जाणेकामी रिक्षात जात असतांना रिक्षाचालक व रिक्षामध्ये असलेला रिक्षा चालकाचा जोडीदार यांनी रिक्षा रेल्वेस्टेशन कडे न नेता रिक्षा खेडी पेट्रोल पंपाजवळ घेवुन रात्री १२.०० वाजेच्या सुमारास त्या प्रवासी यांना त्या दोघांनी शिवीगाळ व दमदाटी करुन मारहाण केली व त्यांच्या जवळील ५ हजार रुपये बळजबरीने काढुन घेतले होते. म्हणुन निलेश शिलारे याने फिर्याद दिल्यावरुन अज्ञात रिक्षा चालक व त्याच्या जोडीदाराविरुध्द एमआयडीसी पो.स्टे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञात रिक्षा चालकाचा गुन्हे शाखेने शोध पथकाकडुन शोध सुरु केला होता. फिर्यादीने सांगितलेल्या रिक्षांचे वर्णनावरुन सदरचा गुन्हा हा एमआयडीसी परिसरातील रिक्षा चालकावर केला आहे. अशी माहिती पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती, त्याप्रमाणे सदर रिक्षा चालकाचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेतले होते. त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन लागलीच त्याच्या दुसऱ्या जोडीदाराला ताब्यात घेतले होते. त्यांच्या कडून गुन्हयात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असुन त्यांना अटक करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बबन आव्हाड, पोउन दत्तात्रय पोटे, पोउनि निलेश गोसावी, पोउनि दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे यांनी केली आहे.