मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 मार्च रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर येथे विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, मात्र या भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेतून अपक्ष व शिंदे गट समर्थक आमदार चंद्रकांत पाटील व शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर हे पुन्हा एकदा समोर आले, असून भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे.
या दरम्यान एकनाथ खडसे यांच्याशी असलेल्या राजकीय वैरा मुळे निमंत्रण पत्रिकेतून भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचे नाव वगळल्याची चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच मुक्ताईनगर मधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.