जळगाव (प्रतिनिधी) – महिला, मुले, ज्येष्ठ, वंचित घटकांना अधिकारी चांगली सेवा देण्यावर पोलीस प्रशासनाचा प्रयत्न राहणार असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. जो कायदा, सुव्यवस्था बाधा आणण्याचा प्रयत्न करेल, त्याची खैर नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिली.
पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने काय उपाययोजना करण्यात येणार आहे व काय नियोजन राहणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी मंगळवारी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांची संवाद साधला.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप गावित पोलीस उपअधीक्षक गृह प्रमोद पवार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक म्हणाले की प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर कोणालाही कोणतीही भीती न राहता सहज फिर्याद देता यावी असे वातावरण तयार करण्यात येईल. त्यानंतर पुराव्याच्या आधारावर कारवाई करण्यात येईल ज्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तेथे गोपनीय खबरे वाढवण्यावर भर राहणार असल्याचेही ते म्हणाले.