नंदुरबार (प्रतिनिधी) – जीवनातील कोणत्याही लढाईत-युद्धात चांगले मावळे असतील तर कोणतीही लढाई-युद्ध सहज जिंकता येते.म्हणून इतिहासातील मावळ्यांकडून शिकावे आपल्या राजा बद्दलची आस्था-विश्वास काय असतो असे मत कोळदा येथील आश्रमशाळेत नंदुरबार एन.टी.व्ही.एस.लाॅ काॅलेज तर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या तिसऱ्या दिवशीय शिबीराच्या दुपारच्या सत्रात प्रा. डॉ.गणेश पाटील सर यांनी व्यक्त केले आहे.
दिनांक १२ रोजी कोळदा ता.जि.नंदुरबार येथील आश्रमशाळेत एन.टी.व्ही.एस.लाॅ काॅलेज तर्फ राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.त्यात प्रा.डाॅ. गणेश पाटील सर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती.सदर दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युवक मावळा ह्या विषयावर व्याख्यान देत होते.
वरील विषयावर व्याख्यानात त्यांनी इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य पद्धती व त्यांच्या कार्यपद्धतीत युवक मावळ्यांचा असलेला सहभाग यावर वेगवेगळ्या घटनाक्रमांचा दाखला देत, युवक मावळ्यांचे कार्य-बलिदान-त्याग यांचे महत्त्व विशद केले.जर आजचा युवक मावळाही आपल्या देशाच्या-राज्याचा-समाजाच्या- कुटूंबाच्या प्रती जागरूक-प्रामाणीक- निष्ठा जपणारा झाला तर माणूस जीवनातील कोणत्याही लढाईत-युद्धात सहज मात करून यश-विजय प्राप्त करू शकतो,असे मत त्यांनी मांडले.
सदर राष्ट्रीय सेवा योजनेचे तिसऱ्या दिवशीय हिवाळी शिबीरात कार्यक्रमाधिकारी प्रा.डाॅ. किरण मराठे सर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वयंसेवक कमलेश वळवी यांनी व्यक्त केले आहे.