पारोळा (प्रतिनिधी) – अमळनेर तालुक्यात पोलिसांच्या पाच ते सहा पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकून सुमारे ५० हजार रुपये किमतीची पाच हजार लिटर दारू नष्ट करून हातभट्टया उध्वस्त करून झिंग उतरवली. यातील काही आरोपींनी पळ काढला.
पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, परिविक्षादधिन पोलीस उपनिरीक्षक बोरकर, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, मधुकर पाटील पोलीस नाईक रवींद्र पाटील, दीपक माळी, नम्रता जरे मोनिका पाटील, मिलिंद बोरसे आदी पोलिसांनी बहादरपूर रोड, पहिलाड भागातील कंजरवाडा,भिल वस्ती, देवगाव, देवळी, रामेश्वर अदि ठिकाणी गावठी दारूच्या हातभट्टीनवर धाडी टाकून दारू बनवायचे साहित्य प्लास्टिक ड्रम यांची तोडफोड करून दारू बनवण्याचे रसायन ५० हजार रुपये किमतीची गावठी दारू नष्ट केली. पोलिसांच्या धाडी सुरू होताच अनेकांनी एकमेकांना कळवल्याने काही आरोपींनी पळ काढला.