मुंबई (प्रतिनिधी) – निवडणूक आयोगाने आज दिलेल्या निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचाच असल्याचा निर्णय दिला असून यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्काच बसला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडल्या नंतर पक्षाची मालकी नेमकी कुणाची ? याबाबत कायदेशीर लढाई सुरू करण्यात आली होती. यात दोन्ही बाजूंनी आपापले दावे सांगितले होते. याच्या समर्थनार्थ कागदोपत्री पुरावे देखील सादर करण्यात आले होते. यात आरोप-प्रत्यारोप देखील झालेत.
या पार्श्वभूमिवर, आज सायंकाळी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अजित पवार यांच्या गटाकडे असल्याचा स्पष्ट निकाल दिला आहे. यामुळे पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्हा अजित पवार गटालाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.